Popular Posts

Powered by Blogger.

Social Icons

Followers

Featured Posts

राधाकृष्ण वाचनालय वावेदिवाळी

Social Icons

Facebook

Popular Posts

Saturday, 19 December 2015
                                     



ग्रामीण भागात वाचनाची कोणतीही सोय उपलब्ध नसते. वर्तमानपत्रही एखाद्या घरी येते, ते सुद्धा नियमित नाही. त्यामुळे पुस्तके विकत घेऊन वाचणे ही फार दूरची गोष्ट. खेडोपाडी रेडिओ, टीव्हीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. मात्र त्याचा उपयोग मनोरंजनासाठी अधिक होत आहे. या मनोरंजनाच्या दुनियेतून तरूण-तरुणींना बाहेर काढणे, लहानांना वाचनाची सवय लावणे, ज्येष्ठांना ताज्या घडामोडींसह आधुनिकतेची माहिती मिळावी यासाठी वाचनालयाची स्थापना करण्यात आली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संजय यशवंतराव कदम यांनी सुरुवातीला मित्रांकडून पुस्तके जमवून, काही पुस्तके विकत घेऊन 15 ऑगस्ट 1998 या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात 'राधाकृष्ण सार्वजनिक वाचनालया'ची स्थापना केली. यासाठी कोकण विभाग ग्रंथालय संघाचे तत्कालीन अध्यक्ष दत्तात्रय शंकर सावंत (सावंत गुरुजी), वि.रा. मेहता सार्वजनिक तालुका वाचनालय गोरेगाव यांची मोलाची साथ मिळाली.

ग्रंथालयाला नुकतीच 17 वर्षे पूर्ण झाली. ग्रंथालय 'क' वर्गात आहे. ग्रंथालयात विविध विषयांवरील 3 हजार 500 पुस्तके आहेत. वाचनालयात 7 वर्तमानपत्रे, 8 नियतकालिके नियमितपणे येतात. त्याचा लाभ परिसरातील अबालवृद्ध घेतात. ग्रंथालयाचे आज 113 सभासद आहेत. ग्रंथालय ग्रामीण भागात असल्यानं स्थापनेपासून सभासद फी नाममात्र ठेवली आहे. वाचकांच्या सोयीसाठी सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांमध्ये ग्रंथालय सुरू असते. वाचकांना हवे असलेले पुस्तक पटकन उपलब्ध व्हावे यासाठी पुस्तकांची विषयवार यादी अद्ययावत ठेवली आहे. हल्ली वेगवेगळ्या वयोगटांनुसार पुस्तकांची मागणी असते. लहान मुले, तरूण-तरुणी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आवडीची पुस्तके खरेदी करण्यावर भर देण्यात येतो. शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी वाचनालयात बसून पुस्तके मोफत वाचायला देण्यात येतात. वाचकांना नवीन पुस्तकांची ओळख व्हावी यासाठी दरवर्षी पुस्तक मेळा घेण्यात येतो.


वाचनालय रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करीत असताना ग्रंथालयाचा वर्ग बदलणे, ग्रंथालयाचे संगणकीकरण करणे, ग्रंथालयासाठी स्वत:ची इमारत बांधणे अशा गोष्टींना प्राधान्य दिले आहे. याकामी ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय संघ यांचे सहकार्य नेहमीच मिळते.

0 comments: